अंकुरला एक मोड
अंकुरला एक मोड


माझ्या अंगणी अंकुरला एक मोड
नाजूकसे छान झाले रोपटे तयार
काही दिवसांनी त्याचा झाला
डौलदार वृक्ष सुंदर
दाट सावली पडू लागली मस्त
कालांतराने त्यास आला हो मोहर
मन झाले प्रसन्न अन्
कोकिळेला फुटला सुस्वर
सुस्वराने त्या मन झाले प्रसन्न
अन् पाहता पाहता इकडे
लागल्या छोट्या छोट्या
कैऱ्या त्या वृक्षाला
रुपांतर झाले त्यांचे आंब्यात
गोड, मधुर आंबे लागले माझ्या अंगणात
किती पाहू अन साठवू किती मनात
ही सारी किमया एका रोपट्याची
एका रोपट्याची