भाऊ बहिणीच नात
भाऊ बहिणीच नात
तुझी आठवण येता मन भरून रे येते
तुला पाहण्याची आस माझ्या मनात तेवते
नाते बहीण भावाचे आहे खूप प्रेमाचे
मोगऱ्याच्या गंधासम नित्य मनी जपायचे
तुज लाभो यश कीर्ती हेच मागणे मागते
आजच्या या शुभ दिनी गणेशाला विनवते
सण आजचा वर्षाचा आहे रक्षाबंधनाचा
नेत्रांच्या निरांजनाने भावास ओवाळण्याचा
कृष्ण जसा द्रौपदीस तसा लाभला तू मला
ओवाळते भाऊराया औक्ष माझे लाभो तुला
असा आनंद सोहळा तुजविण सुना सुना
इथुनी ओवाळीते मी समजूनी घे भावना....