माझ्या प्रेमाचं चांगभलं...
माझ्या प्रेमाचं चांगभलं...


खरच आज खूप वाईट वाटतंय
तुझ्या बोलण्याच आणि माझ्या वागण्याचं
गणितच कळत नाही मला
माझ आयुष्य जगण्याचं
तू बोललास
विश्वास नाही मला
तुझ्या प्रेमावर
तुझ हेच वाक्य
आज बेतलय माझ्या जीवावर
मला नाही महिती
मी आजकाल अशी का वागते
येवढं मात्र नक्की की,
दिवस रात्र फक्त आणि फक्त
तुझ्या आठवणीत जगतो
तुझ्यावर मी खूप प्रेम करते
कसं सांगू हे तुला
तुझी आठवण जरी आली
तर करमत नाही मला
शेवटी एकच सांगते
खूप प्रेम करते तुझ्यावर
देणार नाही कधीही दगा
विश्वास ठेव माझ्यावर
होईल प्रेमाचं चांगभलं