जीवन
जीवन


जीवन जगताना एखाद्या संकटाने
खचून जायचे नसते
त्यांच्याशी दोन हात करून
धैर्याने लढायचे असते
कधी काटेरी रस्ता तर
कधी फुलांचा वर्षाव
क्षणाचा वेळच सारा
बदलतो प्रत्येकाचा डाव
आपल्याकडे जे काही आहे
इथेच सोडून जावे लागते
तरीही माणसं माणसाशी
वैऱ्यासारखे वागते?
दुसऱ्यांसाठीही जगावं
असे मनात असावे धोरण
आपण आज आहे उद्या नाही
हेच तर आहे जीवन