STORYMIRROR

shubhangi gawande

Inspirational

3  

shubhangi gawande

Inspirational

रंग

रंग

1 min
96

गुलाबी, केशरी

पिवळा नि लाल

धुळवड आली

खेळुया गुलाल...


राधा आणि कृष्ण

जाहलेत दंग

आज खेळण्यास 

या होळीचा रंग...


खेळताना रंग

जरा ठेवा भान

इजा न होणार

याचे ठेवा ध्यान...


आपण साऱ्यांनी

बांधूयात चंग

वापरूया फक्त

नैसर्गिक रंग...


भरू पिचकारी

उडवूया पाणी

गाऊयात चला

स्नेहभावे गाणी...


यंदाच्या होळीत

सारे दुःख जाळू

सर्वांच्या स्नेहाने

प्रीतफुले माळू...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational