माझं प्रेम
माझं प्रेम
तुझी ओढ का एवढी
मनी काय समजेना
कसे सारेच घडले
मज काही उमजेना...१
आस असे रोज तुझी
यावी मला भेटायला
स्वप्न सारे समजुनी
झोपी जातो रात्रीसला...२
तुज कसं सांगू आता
प्रेम माझं किती आहे
सारं जग माझ्याकडे
वेडा समजून पाहे...३
राणी वाट होकाराची
हृदयी माझ्या लागलीये
प्रीत गंध फुलण्याची
स्वप्ने खूप पाहिलीये...४
तुझ्या आठवणीत गं
धुंद माझी हरवतो
मिठी माझी बहरुन
वाट तुझी मी बघतो...५