आज कितीतरी
आज कितीतरी


दिवसातून तुला पाहिलं
दाबून ठेवलेल्या आठवणीचा
मनी पाझर लागलं...
वाटलं मी विसरले तुला
हा भ्रम आज समजला मला
तू होता मझ्या मनात
अजूनही आहे तसाच ध्यानात...
सगळं विसरुन गेले
पण तुला नाही विसरले
आज पुन्हा एकदा मनी
त्या दिवसांच्या आठवणीने
काहूर दाटले...
होतास साधा भोळा
मनाने मात्र राजा
तुझ्यापासून वेगळं
होण्याची भोगतेय सजा...
पाहुनही तू मला
न पाहिल्यासारखं केलं
तुझं असं वागणं
हृदयाला स्पर्श करुन गेलं...