ओढ पावसाची
ओढ पावसाची


मृगाचा पहिला पाऊस
कुतूहल लावून जाते मनास
बियाणे घेऊन बळीराजास
धरतो शेतीची कास
नक्षत्र जातात निघुनी
थोडासा शिरकाव करुनी
तु बसतो ढगात रुसूनी
ओढ तुझी या नयनी
वसुंधरा तुला विनवते
तु ये सख्या राग सोडून
दे मला अलींगण
होऊ दे तुझे माझे मिलन
ये तु धावत वेगाने
तुझ्या विना सुनी हि राने
साथ आपली जन्मा जन्माची
का रुसला माझ्या वरती
तू ये लवकर धरतीवरती
सर्वांच्या नयनी ओढ पावसाची