STORYMIRROR

Kshitija Bapat

Tragedy

3  

Kshitija Bapat

Tragedy

फटका

फटका

1 min
168

ओला नी सुका दुष्काळ

असो बसतो बळीराजाला फटका

संकट येतात त्याच्यावर

आत्महत्या करून तो करतो सुटका


जगाचा पोषण करणारा

धनधान्य उगविणारा

बळीराजा असतो नेहमी

गाजलेला कष्ट करणारा


शेतकरी राब राब राबतो

कधी निसर्ग देतो फटका

पिके होता उध्वस्त

कसा करेल संसार नेटका


कर्जाचा डोंगर त्याच्यावर

मोठे कुटुंब घरात

कशा भागवायच्या गरजा

महागाईच्या या युगात



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy