STORYMIRROR

Kshitija Bapat

Action

3  

Kshitija Bapat

Action

तानाजी मालुसरे

तानाजी मालुसरे

1 min
229

शिवबाचे हो मावळे

सरदार शुरवीर

इतिहास घडविला

मराठीचे शिलेदार


जिल्हा सातार्यातील ते

गाव गोंडीली छोटेसे

येथे जन्मले तानाजी

शके सोळाशे सव्वीस


अति पराक्रमी होते

शिवबाचे बाल मित्र

शुर मराठे तानाजी

त्याचा विश्वासाचे पात्र


अवगत होती कला

त्यांना तो गमीनी कावा

धारदार तलवार

शत्रूवर करे धावा


घरी मंगलकार्य होते

तरी परवा केलीच

नाही लढाई कराया

गेले उदयभानशीच


आधी लग्न कोंढाण्याचे

मग लग्न रायबाचे

असे वाक्य ते बोलून

गेले तानाजी शिवाचे


युद्धामध्ये गमाविले

प्राण तो गड जिंकला

शिवराजे उद्गारले

गड आला सिंह गेला



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action