STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Action

4  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Action

वर्षा-कविता

वर्षा-कविता

1 min
321

काळे नभ आकाशात

झुंजती एकमेकांत 

होई त्यांच्यात भांडण

गुरगुरायचे आपसात  


   वारा येई भांडण सोडविण्यास 

   कोणी कुणाचे ऐकेणात 

   कितीही समजावले त्यांना 

   मेळ बसेना एकमेकांत  


पाखरांचे थवे ऐके भांडण 

सख्या रक्तांच्या काळजांची 

येइना कुणा दया माया  

मारामारी चाले एकमेकांची  


त्यातून घडला विनाश 

पडला त्यातून धरतीवर 

झाला कडकडाट सृष्टीवर 

फाटले धरतीचे उदर 


होई आग,आग जीवाची 

आक्रोश झाला धरतीचा 

विनाश झाला माणसांचा 

डोंगर कोसळला दुख:चा 


आली कीव त्या ढगांना 

पाणी पाजले धरतीला 

झाले सर्व सुखी जीव 

आनंद देण्यास जगाला.


अशी असावी ही माया 

देह दुसर्यांसाठी झिजवावा 

मनात असावा निर्मळ विचार 

सुविचार,सत्संगांमध्ये दिसावा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract