नवीन शिक्षण-गीत
नवीन शिक्षण-गीत


जागतिक शिक्षण आलय रं
जुनं सगळं संपलय रं
पारंपारिक शिक्षण संपलय रं
आधुनिक शिक्षण आलय रं
नवीन बदल झालाय रं
तंत्रज्ञान शिक्षण आलय रं
मुलां कडून नवीन शिकायचं रं
सर्वांगीण शिक्षण द्यायचं रं
अध्यापन नाही करायचं रं
अध्ययनावर शिक्षण द्यायचं रं
नवीन बदल झालाय रं
तंत्रज्ञान शिक्षण आलय रं
मुख्याध्यापकांनी प्रशिक्षण घ्यायचं रं
शिक्षकांत मिसळून राहयाचं रं
दोघांनी दुवा साधायचा रं
विद्यार्थी आधुनिक घडवायचा रं
नवीन बदल झालाय रं
तंत्रज्ञान शिक्षण आलय रं
मुलांत उत्साह वाढवायचा रं
स्वयंप्रेरणेचे शिक्षण द्यायचं रं
नवनवीन प्रयोग करायचं रं
बुद्धीला जागरूक करायचं रं
नवीन बदल झालाय रं
तंत्रज्ञान शिक्षण आलय रं
क्षमता मूल्यमापन करायचंय रं
विद्यार्थी शिक्षण करायचं रं
शोधक विद्यार्थी शोधायचं रं
त्यांच्याशी गट करायचं रं
नवीन बदल झालाय रं
तंत्रज्ञान शिक्षण आलय रं