कडुलिंब
कडुलिंब

1 min

5
कडुलिंब -कविता
रचना -कवी,लेखक,शिक्षक-संजय रघुनाथ सोनवणे
लिंब फुलला,फुलला
माय मातीच्या कुशीत
गडद हिरव्या पानांचा ठेवा
ठरला मानवास कुशीत
खडतर परिस्थितीत उभा
सेवा पांथस्थाची करण्यात
तुझ्या थंड गारव्यात
जीव रमतो सुखात
डौलदार तुझे शरीर
खेळतो वार्यासोबत
घट्ट तुझी मैत्री
असते खरोखर ह्रदयात
बहुगुणी असे महत्त्व
कल्पवृक्ष म्हणून आयुर्वेदाने
मानव सुखी केला
तुझ्याच साऱ्या शरीराने
शारिरीक पीडा जाई
तुझ्याच सेवनाने
कडूचव असूनही पानात
महान ठरला अभिमानाने