आयुष्याची कमाई
आयुष्याची कमाई


माझी आयुष्याची कमाई
माझी कन्या खरी माई
प्रतिष्ठा,धन, दौलत काही
याहून जीवंत मन श्रीमंती
कन्या असावी प्रत्येकाला
देवीचा अवतार घरोघरी
दीप असावा दारोदारी
प्रकाश पसरावा अंतरी
अंधार घालवी जीवनाचा
आनंद देई जीवनात
मुलगी निस्वार्थ जगणे
असावी आपल्या आयुष्यात
मुलगी निर्मळ माया
सार्या विश्वाची माऊली
सार्या नात्यांचा संगम
आधाराला खरी साऊली
मुलगी आईबापाची संपत्ती
कुटुंब संस्काराची शिदोरी
होईल देशाची प्रगती
पुण्यवान भारत नगरी
तिला वाढवा शिकवा
हातभार कुटुंबाला
बनवा स्वावलंबी मुलीला
द्या चालना नारी शक्तीला