सकाळ-कविता
सकाळ-कविता

1 min

222
सकाळच्या रे आगमनानं
येते लक्ष्मी दारी
ऊठा,ऊठा लवकर
आळस सोडा रे लवकरी
आळस आयुष्यातील पिडा
नाही स्वतःची प्रगती
जडतो रोग अंगाला
माणूस जातो अधोगती
आळसी होते मती
होतो माणूस कंगाल
पृथ्वीला होतो भार
होते जगणे हालहाल
शक्ती आहे रे अंगात
चैतन्य येवू दे जीवनात
नको लाचारीचे जगणे
हिंमत ठेव रे श्रमात
नको कुणास रे बोजा
येऊ दे ऊमेद अंगात
कष्ट कर भरपूर
सलाम करतील जगात