पोवाडा -15ऑगस्ट
पोवाडा -15ऑगस्ट


जय,जय भारत देशाला
अविस्मरणीय महान दिनाला
15ऑगस्ट 1947सालाला
पारतंत्र्य मुक्त देशाला जी जी जी
पोवाडा स्वातंत्र्य दिनाला
महिमा गाऊन देशाला
आठवण राष्ट्रीय सणाला
स्फुर्ती संचारावी अंगाला जी जी जी
15ऑगस्ट 1947स्वातंत्र्य दिनाला
झेंडागीत तिरंगा झेंड्याला
सलामी देऊन ध्वजाला
राष्ट्रगीत गाऊन देशाला जी जी जी
15ऑगस्ट 1947दिन
भारताचे खास भूषण
भारतीयांची मान उंचावून
झेंडा फडकतो अभिमानान जी जी जी
15ऑगस्ट 1947 चा इतिहास
आठवण व्हावी भारतीयांस
स्वातंत्र्य हाच होता ध्यास
रक्तरंजित क्रांतीचा इतिहास जी जी जी
ही गाथा आहे बलिदानाची
ही क्रांती होती त्यागाची
देशासाठी समर्पित क्रांतीवीरांची
ब्रिटिशांच्या जाचातून मुक्तीची जी जी जी
इतिहास घडला खरोखर
क्रांतिकारक गेले फासावर
पाणी सोडले संसारावर
ब्रिटिशांना केले जर्जर जी जी जी
भारताची आजाद हिंद सेना
यश सुभाषचंद्र
बोस यांच्या उठावांना
महात्मा गांधींजींच्या असहकार चळवळीना
लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारांना जी जी जी
झाशीची राणी देशभक्तीने पेटली
ब्रिटिशांची तिने हो वाताहात केली
मर्दानी ती निकराने,हिंमतीने लढली
देशाच्या स्वातंत्र्यात वीरांगना ठरली जी जी जी
बाबू गेणू शहिद झाले
क्रांतीसिंह नाना पाटील भुमीगत झाले
विनायक सावरकरांचे हाल केले
काळ्यापाण्याच्या शिक्षेस पाठविले जी जी जी
देशात असंतोष पेटला
सर्व भारत एक झाला
ठिक,ठिकाणी उठाव झाला
ब्रिटिशांनी गोळीबार केला जी जी जी
ब्रिटिशांचा क्रोध वाढला
अमानुष गोळीबार केला
जालियन वाला बाग रक्ताने माखला
सडे पडले रक्ताचे त्या जागेला जी जी जी
ब्रिटिशांचे अत्याचार वाढले
भगतसिंग,राजगुरु,सुखदेव फासावर चढविले
भारतीयांचे रक्त सळसळले
15ऑगस्ट 1947ला ब्रिटिशांस पळविले जी जी जी
शाहिराने साज चढविला
सदैव प्रेरणा मिळावी देशाला
स्वातंत्र्य रक्षण कर्तव्याला
शहिदांचे स्मरण देशाला जी जी जी