सकाळ
सकाळ

1 min

49
सकाळच्या सोनेरी रवीकिरणांनी
होते दिवसाची सुरुवात
नव्या आशाआकांक्षा,
चैतन्य सळसळते मनात
रात्रीच्या भयाण शांततेची जागा
घेतात पक्षी किलबिलाट करून
मोत्यांसारखे चमकणारे दवबिंदू
घेतात साऱ्यांचे लक्ष वेधून
फुलांचे गुच्छ दिसतात
कळीतून फुलताना
मंदिरातील घंटानाद
प्रसन्न करी साद घालताना
सकाळी सगळ्यांनाच असते
कामावर जाण्याची घाई
नुसती कशी पळते
घड्याळाची सुई