STORYMIRROR

Priti Dabade

Action Inspirational Others

3  

Priti Dabade

Action Inspirational Others

नंदादीप

नंदादीप

1 min
213

देवासमोर नंदादीप

अखंड तेवतो

चैतन्याने घर

प्रज्वलित करतो


करून टाकी

अंधकार दूर

शांत करी

मानसिक हुरहूर


वाईट शक्तींचा

होई नाश

पडता नंदादीपाचा

लख्ख प्रकाश


तिळाचं तेल

भक्तीची वात

नंदादीप लावता

लक्ष्मी घरात


नंदादीपात असे

ईश्वराचा वास

सुखसमृद्धी, समाधान

मिळे हमखास


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action