प्रेमाचे वेड
प्रेमाचे वेड
वेड लागले प्रेमाचे
हृदय दुःख सोसते
मनातले प्रेम कसे
डोळ्यात दिसते
प्रेम आणि वेड
अंतरीचे खेळ
दोन मनाचे मिलन
त्याचा नाही कुठे मेळ
झाले पूर्णपणे मी
तुझ्या प्रेमात वेडी
वाढत आहे प्रीतीची
थोडी थोडी गोडी
नको सांगू सख्या
वेड हे प्रेमाचे
मनातच राहू दे
प्रेम आपल्या दोघांचे
जमली छान
तुझी माझी जोडी
चल मग घालू
लग्नाची बेडी

