STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Romance

3  

Sanjay Raghunath Sonawane

Romance

प्रितीचा पाऊस-गीत

प्रितीचा पाऊस-गीत

1 min
1.2K



अशी कशी तुझी प्रीत माझ्यावर जडली

तुझ्या प्रेमाच्या सरीनी न्हाऊन निघाली


लागले वेड मला तुझ्या आठवणीचे

तुझ्या हळव्या स्पर्शाने भिजले मन प्रितीचे


तुझ्या टपोऱ्या थेंबांनी भिजले माझे अंग

कायम रहावा तू माझ्याच संग


कोवळी माझी काया, नाजूक माझी भावना

तुझ्याविणा मला बाई आता राहवेना


स्वप्नात तू आणि वास्तवात तू

रात्रीची झोप मला काही येईना


सारे रान झाले बेभान तुझ्या प्रितीने

खट्याळ वारा येऊन राही सोबतीने


हिरव्या, हिरव्या रानाची प्रीत तुझ्यावर जडली

अशी कशी आमच्यावर तुझी प्रीत जमली


तुझ्याविना सारे अधूरे, तू जगाची सावली

सांग, सांग, तुझी नावे किती गाजली


तूच आमचा कान्हा, मीच तुझी राधा

तुझ्या प्रेमाचा कधी करणार वायदा


राहवेना तुझ्याशिवाय प्रेम करते खरोखर

नको मला फसवू, विश्वास तुझ्यावर


तूच माझा सखा अन तूच प्राण

तुझ्या भरवस्यावर सोडले सारे सुखी जीवन


तूच तारणारा आणि तूच मारणारा

विश्वाचा कर्ता आणि तूच राखणारा


तुझी कीर्ती सारी जगामध्ये रे दिसे

सारे जीव तू केलेस प्रितीत वेडेपिसे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance