STORYMIRROR

Prachi Kulkarni

Romance

5.0  

Prachi Kulkarni

Romance

आधार-गुलाब

आधार-गुलाब

1 min
1.1K


आपण दोघांनी लावलेल्या

पहिल्या - वहिल्या गुलाबाच्या झाडाचे फूल

मी अलगद हातांनी हळूवार खुडलं

आणि माझी ओंजळ , माझं मन

भरून गेलं त्या सुगंधाने...

पण त्या अर्ध-रुजल्या झाडाला मात्र...

तू खाली दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवलं होतंस.

गुलाबाच्या पाकळीचा रंग तुझ्या हातांना चढला होता........

तुझ्या अशा भक्कम आधारावरच माझ्यातला मी उभा होता........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance