STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Romance

5.0  

Prof. Dr.Sadhana Nikam

Romance

तू थांबवायचं होतस

तू थांबवायचं होतस

1 min
776


तू थांबवायचं होतस

सागर किनारी न्यायचं होतस

हातात हात घेवून

अवखळ लाटांशी झुंझायच होतस


तू थांबवायचं होतस

पाण्याशी खेळायचं होतस

डोलणाऱ्या नावेवर

मला सावरायचं होतस


तू थांबवायचं होतस

मावळत्या सूर्याला पहायचं होतस

तांबडया किरणांसोबत

नहायचं होतस



तू थांबवायचं होतस

किनाऱ्यावरच्या ओल्या मातीत

पावलांच्या खुणा उमटवत

चालायचं होतस


तू थांबवायचं होतस

किनाऱ्यावर बसून

सूर्यास्ताच्या साक्षीन

वचन दयायचं होतस


तू थांबवायचं होतस

अखेरच्या क्षणांपर्यंत

शेवटच्या श्वासासोबत

रहायचं होतस


तू थांबवायचं होतस

तू थांबवायचं होतस.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance