STORYMIRROR

Prof. Dr.Sadhana Nikam

Romance

3  

Prof. Dr.Sadhana Nikam

Romance

तू थांबवायच होतस

तू थांबवायच होतस

1 min
202

तू थांबवायच होतस

सागर किनारी न्यायच होतस

हातात हात घेवून

अवखळ लाटांशी झुंझायच होतस


तू थांबवायच होतस

पाण्याशी खेळायच होतस

डोलणार्या नावेवर

मला सावरायच होतस


तू थांबवायच होतस

मावळत्या सूर्याला पहायच होतस

तांबडया किरणांसोबत

नहायच होतस


तू थांबवायच होतस

किनार्यावरच्या ओल्या मातीत

पावलांच्या खुणा उमटवत

चालायच होतस


तू थांबवायच होतस

किनार्यावर बसून

सूर्यास्ताच्या साक्षीन

वचन दयायच होतस


तू थांबवायच होतस

अखेरच्या क्षणापर्यत

शेवटच्या श्वासासोबत

रहायच होतस

तू थांबवायच होतस

तू थांबवायच होतस. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance