ती
ती
लढत असते ती
किती तरी रणांवर
घरी दारी आणि
समाजाच्या उंबरठयावर
डगमगत नसते ती
आयुष्याच्या रणांगणावर
हार ही मानत नसते
अपयश मिळाल्यावर
खचत नसते ती
निराशेच्या मार्गावर
तडजोड करत असते
जीवनाच्या वळणावर
चालत असते ती
ठेचाळणार्या रस्त्यावर
सावरत असते स्वतःला
काटयांच्या कुंपणावर
धडपडत असते ती
प्रत्येक पावलावर
अधिराज्य गाजवते
स्वतःच्या विश्वावर
पाझरत असते ती
डोळ्यांच्या कडांवर
संयमाने जगत असते
आत्मसन्मानाच्या वाटेवर