हे प्रेम तर नव्हे
हे प्रेम तर नव्हे


नदीच्या किनाऱ्यावर सूर्यास्ताला
तुझ मैत्रिणींसोबत येण
आणि अचानक
मागे वळून पहाण
हे प्रेम तर नव्हे.
मैत्रिणींशी हितगुज करताना
तुझ खळखळत हसण
आणि तुझ्या गप्पात
माझ असण
हे प्रेम तर नव्हे.
एकमेकांची नजरानजर होताना
तुझ नजर चुकवण
आणि तिरप्या
नजरेने पहाण
हे प्रेम तर नव्हे.
इशाऱ्याने खुणावण
भेटीस बोलावण
आणि एकांतात
दोघांच भेटण
हे प्रेम तर नव्हे
नाव सतत ओठांवर असण
एकमेकाला वचन देण
साथ जन्माची मिळू दे
अस म्हणण
हे प्रेम तर नव्हे.