रंगात रंगूनी
रंगात रंगूनी
नाते जुळले कसे
हे मला कळले नव्हते
मनाच्या कप्प्यात
नाव तुझे कोरले होते
हृदयात ही तुलाच
जपून ठेवले होते
आठवणींच्या अश्रूतून
तुलाच सांडले होते
अबोल जरी असलास तू
तरी तुझ्यासाठीच भांडले होते
शूरांच्या पावनभूमीत
अमर सारे जन्मले होते
तिरंग्याच्या प्रेमात मी ही आता रंगले होते

