समुद्र
समुद्र
1 min
177
हे अथांग सागरा
मौन सोडशील का रे जरा
तुझ्याशीच बोलायला आले मी किनाऱ्याला
अवखळच आहेस तू
वाळू सांगत होती मला
कितीतरी वेळा भिजवलेस तू तिला
जलचरांनासाठीचा तूच एक सहारा
किती खूश असतात ते
माहिती आहॆ का रे तुला
शिंपल्यातला मोती सुद्धा
भेटला मला परवा
सांगत होता सागरातला मीच
एक खजिना
इथेच राहतो मी म्हणाला
झुळझुळणारा वारा
गाणे माझे आवडते ह्या सागराला
सूर्य सुद्धा गेला आता अस्ताला
चांदणे म्हणाले आम्ही आहोत की सोबतीला
अजूनही होते मी तिथेच किनाऱ्याला
तुला पाहता पाहता गाणे माझे बनवायला..
