तू आणि ती
तू आणि ती
पावसाला पाहिले
अन तुलाच आठवत राहिले
तसा दररोजच येतोस तू
पण तुला तिच्यासोबत पाहिले
तिला पाहता पाहता माझे
भान कुठे राहिले
तिच्या मस्त आठवणीने
मन भरून वाहिले
ती होती खमंग तू
होतास वाफाळलेला
कांद्याशिवाय ती नाही आणि
तू तिच्याशिवाय अधुरा
पावसातले हे नाते
असेच अतूट राहिले
भजी आणि चहाशिवाय
पावसाळ्यातले दिवसच
नाही पाहिले.
