पाऊस
पाऊस
सृष्टीला भिजवताना
पाऊसच खूप भिजला होता
ढगांच्या कुशीत
सूर्यही निजला होता
हिरव्या हिरव्या झाडांनी
डोंगरही सजला होता
झाडावरचा पक्षीही
घरट्यातच थांबला होता
उनाड वाऱ्याने आपलाच
सूर धरला होता
रिमझिम रिमझिम
पावसात निसर्गच
जणू नटला होता
