श्वास
श्वास
तुझा माझा संवाद
एक गुंफलेला अंतर्नाद
तू बोलत नाहीस तरी
घातला का मी वाद
ठाऊक आहे मला
शब्द थांबलेत तुझ्या मनात
राहिलेत आता ते
आठवणींच्या हृदयात
सुरु झाला आता हा
अनोखा प्रवास
की आहे नुसता भास
तू माझा होशील म्हणून
कोंडलेला श्वास
मनातल्या शब्दांना
मोकळी करून दिलेली वाट

