विठूमाऊली
विठूमाऊली
1 min
152
आषाढीची वारी
करती वारकरी
पाऊले चालली
पंढरीच्या दारी
टाळमृदूंग हाती
वैष्णव ते नाचती
श्रीरंगाचे नाम ओठी
अलौकिक ती विठ्ठलभक्ती
तुळशीमाळागळा
भाळी चंदनाचा टिळा
विटेवरी उभा हा
विठोबा सावळा
त्या सावळ्यातूनी
दिसे मजला एक रंग
पांडुरंग
