वृक्षवल्ली
वृक्षवल्ली
हिरव्या रंगानी रंगूनी
सौदंर्य आणले तरुंनी
काळ्या मातीशी गुंफले नाते
धागे घट्ट विणूनी
छाया दिली त्यांनी
उन्हात उभारुनी
पावसाच्या थेबांचे केले
दागिने वृक्षांनी
वाऱ्याच्या गाण्यात सूर
मिसळले पानांनी
सोबतीला आणले
फुलांना बोलावूनी
गाणे गाता गाता
गोड फळे दिली झाडांनी
फळे चाखता चाखता
बांधली घरटी पक्ष्यांनी
सृष्टीसाठी केले सारे
निःस्वार्थ होऊनी वृक्षांनी
आपणही रंगून जाऊ
झाडांच्या रंगातूनी
