आमची मॅडम
आमची मॅडम


आमची मॅडम बाजार करते
स्वस्त महाग घेतच असते
संग मात्र मला नेते
दोन पिशव्या हाती देते ---- || धृ ||
पहिले करते वेणी फणी
मगं लावते तोंडाला पाणी
गजरा असतो वेणीला
साद घालते जनीला
बडबड सारखी चालुच असते ---|| १ ||
नंतर करते नट्टा फट्टा
पावडर लावते बटा बटा
ओठ असते लाल लाल
हाती तिच्या असे रूमाल
चप्पल बाकी भारीच असते --- || २ ||
साडी पैठणी नसायला
गाडी हवी बसायला
अधून मधून ओरडते
पैशासाठी झगडते
नेहमीच पैसा माघत असते ---- ||३ ||
दोन किलो घेते गांजर
नोट आख्खी देते शंभर
मिरची घेते लाल लाल
आमचे बाकी भलतेच हाल
फिरुन फिरुन पाय थकते ---- || ४ ||
मला म्हणते येथे बसा
खाऊन येते मसाला डोसा
मगं म्हणते घेऊन या दळण
सांगा ईला लाऊ कसं वळण
आमची मॅडम बाजार करते ----- || ५ ||