कन्यादान
कन्यादान
माया लग्नाच्या कायजीन
नको घेऊ बापू फाशी
जमा व्हईन कशीतरी
कन्यादानाची राशी।।
या दुष्कायाच्या माऱ्यान
पूरा केला हाय भुगा
माया बापू सारख्याचा
फुटला हाय फुगा।।
दोन तीन वर्षाची
दुष्कायाची झय
आता म्हणे कस आणू
लगीन करायच बळ।।
नको मले लग्नात
भरजरी नवा शालू
नाय आवाक्यात त
कायले ते घालू।।
म्या माया लग्नात
मेकप नाय करणार
n>जशी हाय तशीच म्या उभी रायणार।। हुंड़ा देऊन मी नाही करणार लगीन जो देईल खर्चाले फाटा तसाच नवरा बघीन।। माया लग्नात नको घोड़ा अन बैंडबाजा पायी आला तरी चालन माया स्वप्नातला राजा।। पैसा नाय म्हणून हाय नग खाऊ कसा करू खर्च याचा नको करु बाऊ।। बापू अस घाबरुन नको स्वीकारु मरण तुहया माघारी माय कन्यादान कोण करन।।