STORYMIRROR

Sanjay Pande

Romance Others

3  

Sanjay Pande

Romance Others

प्रेमाचे भाव

प्रेमाचे भाव

1 min
228

तूला पाहाताच सखे

देहभान माझे हरवते

तुझ्या मनातले भाव

तू का बरे लपवते।।


तुझ्या नयनातील ते

समजतात ग इशारे

तू किती ही लपव

खुलवतात मनी पिसारे।।


हृदयातील या नात्याला

कशी तू थांबवशील

प्रेमाच्या या स्पदनांना

खरेच तू अडवशील।।


मला नाही म्हणताना

तुझा स्वर कातरतोय

प्रेमाच्या आणाभाकाचा

आवाज आज आठवतोय।।


माझ्याकडे एकदा पाहुन

नाही म्हणू शकशील

माझे हे दुःख पाहून

खरेच का तू हसशील।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance