STORYMIRROR

Priyanka Bhasme

Romance

3  

Priyanka Bhasme

Romance

ओढ पावसाची

ओढ पावसाची

1 min
71

आल आभाळ भरुन, 

   ओढ लागे पावसाची.. 

चिंब भिजून जातांना, 

   सोबतीला साजण्याची.. 


बेभान वाऱ्याने येऊन, 

  अलगद मला छेडण्याची.. 

निसर्ग नटीचाही छंद, 

  दवबिंदूशी खेळण्याची..


हिरवळीचे मखमल ते, 

   तरुवेलीवर पाहण्याची

बहरलेल्या ऋतूत मी, 

    गिरक्या घेत नाचण्याची..


फुलांचा गंध मोहक तो, 

    चोहिकडे पसरण्याची..

येता श्रावण सरी अंगावर, 

    थेंब सरीचे झेलण्याची..


चातक पक्ष्याच्या त्या, 

     इच्छा तृप्त होण्याची.. 

सृष्टीत कुंचल्याने मुक्त, 

     मनमोहक रंग भरण्याची..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance