STORYMIRROR

Priyanka Bhasme

Others

3  

Priyanka Bhasme

Others

* *नववधू* *प्रिया*

* *नववधू* *प्रिया*

1 min
353

नववधू प्रिया मी बावरते,, 

गहिवरते थोडे, थोडे सावरते,, 

अपरिचित तु प्रीत तुझ्याशी जोडते, 

आई- बाबांच्या लाडाची मी, 

सोडून जातांना त्यांना, अश्रु डोळ्यातले ओघळते, 

नववधू प्रिया मी बावरते...... 


घाबरते थोडे, थोडे आवरते,, 

हातात हिरवा चुडा, नाकात नथ मी तुझ्याच नावाची घालते, 

संसार माझा, तुझ्यासोबत मांडते, 

नाव तुझे ते माझ्या नावासोबत जोडते, 

साजश्र्रुगांर अंगावर माझ्या, मी तुझ्या नावाचा करते, 

नववधू प्रिया मी बावरते,, 


अडखळते थोडे, थोडे चालते,, 

सुख:दुखात तुझ्या मी, माझे सुख दु:ख मानते, 

सोडून आपले माझे, परके आपले मानते, 

विसरुन माझ्या वाटा तुझ्यावाटेवर मी चालते, 

नववधू प्रिया मी बावरते,, 


हरवते थोडे, थोडे शोधते,, 

जीवनगीत माझे, तुझ्या स्वरात गाते, 

कवितेत मी माझ्या, तुझे शब्द जोडते, 

तुझ्या आवडीना मी, माझ्या आठवणीत जोडते, 

विसरुन सारे जग, तुझ्यातच मी माझे जग ते बघते, 

नववधू प्रिया मी बावरते,


साहित्याला गुण द्या
लॉग इन