मोगरा
मोगरा
मी माळायची मोगरा केसात माझ्या,
बघुनी मजकडे तू अलगद भाळायचा,
भिरभिरणाऱ्या नजरेत तू फक्त मला शोधायचा...
कळायचं मला सगळंच पण मी तुझ्यापासून माझी नजर चुकवायची,
मोगरा माझा हटखोर एवढा दरवळ त्याचा तुझ्या हृदयात ठेवायचा...
दरवळणारा तो...
गंधणारी मी तुझ्यात तेवढी उरायची,
तू असला सोबत की मोगऱ्यासारखी बहरायची,
जाता दूर तुझ्यापासून मी ही कोमेजून जायची,
मोगरा नि मी तुझ्यासोबत नेहमी असायची,
मोगरा तुला सुगंधात तर मी तुला स्वप्नात सदा जपायची...

