STORYMIRROR

Priyanka Bhasme

Romance

3  

Priyanka Bhasme

Romance

एक रात्र अशी असावी...

एक रात्र अशी असावी...

1 min
469

एक रात्र अशी असावी, 

तुझ्या बाहुपाशात मी निजावी,

तुझ्या स्वप्नात अलगद बहरावी,

साथ तू माझी, मी तुझी असावी, 

चोहीकडे त्या प्रीतसप्तरंगाची उधळण व्हावी, 


तु माझ्यावर सुंदर कविता रचावी,

मी तुझ्या कवितेतल्या प्रत्येक शब्दात मुक्त बहरावी, 

तू बोलावे माझ्याशी, 

मी तुझ्याकडे एकटक बघून हसावी, 

तुला माझी ती अव्यक्त भाषाही कळावी, 

जिथे फक्त तुझी नी माझी प्रित जुळावी, 


सर्व काही विसरून जरी, 

मीच तुझ्या चिरस्थायी स्मरणात उरावी,

तुझ्या संगतीत मी अशी काहीशी मोहरावी,

जणू मी मलाच न कळावी, 

अशी काहीशी रात्र एखाद्यी... 

आपल्याही सोबतीला असावी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance