नारी शक्ती
नारी शक्ती
किती ही वर्णावी। नारीची महिमा।
करे न ती तमा। कशाचीच।
होता ताराबाई। मुघलांशी लढे।
गड तोच चढे । ताकदीने ।।
सावित्री, रमाई । झटल्या सतत।
यातना पेलत । समाजात।।
देतसे सर्वाना। हक्काचे शिक्षण।
करे त्या रक्षण। पिडीतांचे।।
हिरकणी तीच । उतरली कडा
सोसूनही पिडा। मुलासाठी।।
घोड्यावर स्वार ।झाशीची राणी
पाजविले पाणी। इंग्रजांना।।
राणी येसूबाई । जरी कारागृही।
झुकली ती नाही। मुघलांना ।।
सत्याग्रहात तो। त्यांचा सहभाग।
ज्वलंत ती आग। घोषणेत।।
कित्येकच थोर। नारीचे या कृत्य ।
केलेले हे नित्य । आनंदाने ।।
