STORYMIRROR

Priyanka Bhasme

Others

2  

Priyanka Bhasme

Others

*तु* *केले* *माझ्यावर* *प्रेम*

*तु* *केले* *माझ्यावर* *प्रेम*

1 min
3.0K

तु केले माझ्यावर प्रेम

पण मी तुझ्यावर थोडे जास्तच केले.... 

सांगता न येणारे भाव मनातील माझ्या, 

तुझ्या पुढ्यात वाहुन दिले, 

तु केले माझ्यावर प्रेम पण मी तुझ्यावर थोडे जास्तच केले.. 

तु रेखाटले तुझ्या कवितेत मला, 

मी मात्र माझ्या आयुष्याच्या पुस्तकात तुझे नाव कायमचे कोरुन गेले, 

तु केले माझ्यावर प्रेम पण मी तुझ्यावर थोडे जास्तच केले.... 

समज नासमज प्रेमाचा मला तुझ्या, 

मला कळण्यातच राहुनी गेले, 

तु केले माझ्यावर प्रेम पण मी तुझ्यावर थोडे जास्तच केले... 

घाव तुझ्या नजरेचे माझ्या ह्दयात पाडून गेले, 

तु केले माझ्यावर प्रेम पण मी तुझ्यावर थोडे जास्तच केले.... 

मलाच न कळले कधी ह्दय हे माझे तुझ्याच सहवास असे का रुळुनी गेले, 

तु केले माझ्यावर प्रेम पण मी तुझ्यावर थोडे जास्तच केले.... 

आघात तुझ्या प्रेमाचे मला कळताच राहुन गेले, 

तु केले माझ्यावर प्रेम पण मी तुझ्यावर थोडे जास्तच केले... 

जगावेगळे प्रेम हे माझे

 तुला पाहता पाहताच राहुन गेले, 

तु केले माझ्यावर प्रेम पण मी तुझ्यावर थोडे जास्तच केले... 

योग्य वेळ येण्याच्या नादात माझे हे तुला सांगणे राहुन गेले, 

की,, तु केले माझ्यावर प्रेम पण मी तुझ्यावर थोडे जास्तच केले... 

Rate this content
Log in