सांग मना
सांग मना


सांग मना तिला हसायला
कधी कधी गोड दिसायला
चोरून पाहता पाहता
माझ्यावर उगा रूसायला
माझा खट्याळपणा सांगतो
फुलापरी डोलायला
तुझ्या खोलवर लपलेल्या
भावना माझ्याशी बोलायला
सांग मना कधी तिला नाचायला
नको वेदनांचे काटे बोचायला
साठवू नकोस मनात सल
सुरवात कर स्वप्ने रचायला