शिवार
शिवार
बीज अंकुरे पाहती
थेंब झेलण्याची वाट
बाप शेतकरी माझा
झेले पावसाची लाट
खेचरात साचे पाणी
भातं लागणं करूया
पावसाला ओंजळीत
आनंदाने ग धरुया
झरु लागले निर्झर
हिरवळ डोलू लागे
थेंब थेंब पावसाचा
सुगंध मातीत जागे
ऊन पावसाचा खेळ
लगबग घडे रानी
सोसाट्याचा सुटे वारा
शिवारात गातो गाणी