सोहळा
सोहळा
हे गीत तुझ्यासाठी सखे
लिहीले कधीच होते
तू समोर असताना
मी गायले देखील होते
पण भावना मनातल्या
मनातच तरळत होत्या
ओठांवर फक्त माझ्या
ओव्या तुझ्याच होत्या
नाही प्रित मनातली
ओठांवर कधीच आली
तुला पाहता फक्त
आली गालावर लाली
डोळ्यात तुझ्या कितीदा
सखे विरघळून गेलो
गजरा बनून केसात
कितीदा दरवळून गेलो
सोहळा प्रेमाचा माझ्या
मी रोजच साकारतो
तुझ्या साथीचा गुलकंद
जीवनात आकारतो