भोपळ्यातली म्हातारी
भोपळ्यातली म्हातारी
भोपळ्यातल्या म्हातारीची गोष्ट तर सर्वांनीच ऐकली असेल पण आज आपण आधुनिक भोपळ्यातील म्हातारीची गोष्ट पाहणार आहोत.
अचलपूर नावचे एक खेडे होतं आणि त्या खेड्यात कमलाबाई नावाच्या आजी राहत होत्या .आचलपूर हे जंगलांनी वेढलेलं गाव होतं. त्यामुळे बऱ्याचदा जंगलातले प्राणी हे गावातल्या लोकांना दिसून येत असत रात्री अपरात्री घराच्या बाहेर पडायला लोक घाबरत असत. कमळाबाईचं घर मात्र अगदी जंगलाच्या कडेला होतं आणि ही कमळा आजी एकटीच तिच्या घरात राहायची.
इतकी वर्ष एकटी राहत असल्यामुळे कमळाबाई मात्र चांगलीच धाडसी होती बरं का.
सोबतीला दोन म्हशी आणि चार-पाच कोंबड्या हे तिचं कुटुंब होतं. लेकीचं लग्न झाल्यामुळे लेक बाजूच्याच गावात तिचा संसार थाटून राहत होती .कमळाबाई सुद्धा अधून मधून तिच्याकडे राहायला जायच्या. बर जंगलातल्या प्राण्यांचा होणारा त्रास हा कमळाबाईला सुद्धा काही चुकला नव्हता म्हणून तिने स्वतःचे रक्षणासाठी एक गाडी तयार केली होती आणि ती सुद्धा भोपळ्याच्या आकाराची.
या गाडीला दोन चाकं सायकल प्रमाण होती आणि चावी फिरवली की चालू होणार अशी गाडी गावातल्याच एका दुचाकी दुरुस्त करणार्या गॅरेज मधनं बसवून घेतलं होती. हुशार होती तशी कमळाबाई.
एकदा काय झालं कमळाबाईच्या लेकीचा निरोप आला दोन-तीन दिवसासाठी माझ्याकडे राहायला ये.
मग काय कमळाबाईची तयारी सुरू झाली नातवंडासाठी काय काय बनवू नी काय नको असं तिला झालं .भरपूर काय काय बनवून घेतलं की लाडू ,करंज्या आणि भरलेल्या पिशव्या घेऊन म्हातारी कमळाबाई निघाली आपल्या लेकीकडे तिच्या भोपळ्याच्या गाडीत बसून.
रस्ता हा जंगलातूनच चालला होता त्यामुळे तिला ठाऊक होतच जंगलातले प्राणी आपल्याला नक्की जाडवे येणार आणि झालं ही तसंच जाता जाता तिच्या भोपळ्याच्या गाडी समोर आला भला मोठा वाघ .वाघ गाडीभोवती फिरू लागला. यापूर्वी त्यांने पाहिलेला भोपळा त्याला आता ओळखेना कारण ,कारण कमळाबाईच्या भोपळ्याला तर चाक होती ना!
वाघाने थोडे पाहिलं आणि विचार करू लागला की आता भोपळ्याला चाक सुद्धा दिसायला लागलीत पण तरीही त्यांने ओळखलंच की याच्यामध्ये नक्कीच कोणीतरी बसलेलं असणार मग तो त्याच्या पंज्यांनी गाडीवरती हात वारे करू लागला म्हातारीचे हे लक्षात आलं.
तिने हळूच खिडकीची काच थोडीशी खाली केली आणि पाहिलं तर समोर वाघोबा. म्हातारी थोडीशी घाबरली खरी पण ती धाडसी होती तिने लगेचच काच लावून घेतली आणि गाडीचा हॉर्न वाजवायला लागली. गाडीचा हॉर्न ऐकून वाघोबा थोडासा दचकला पण तो शेवटी वाघोबाच तो काही तिथून हालेना
म्हातारीला पडला प्रश्न आता काय करायचं मग आतूनच म्हातारीने बोलायला सुरुवात केली "काय रे वाघोबा काय हवय तुला".
<p>"काय ग म्हातारे लपून बसलीस होय मी तुला ओळखले मागच्या वेळी तू मला फसवून गेलीस ना आता काय मी तुला सोडणार नाही ",वाघोबा म्हातारीला म्हणाला.
आता मात्र म्हातारीला भीती वाटू लागली पण तरीही ती म्हणाली आपण एक आता प्रयत्न करून बघूया
म्हातारी म्हणाली "अरे वाघोबा मागच्या वेळी मी थांबले होते पण तू आणि कोल्होबा दोघ भांडू लागला आणि तुमची भांडण इतकी विकोपाला गेली की मला त्याची भीती वाटू लागली आणि म्हणूनच मी तिथून निघून गेले बघ".
खरंतर मला जायचं नव्हतं च पण काय करू तुम्ही इतका जोरजोराने भांडत होता की मला काही सूचनाच यावेळी मात्र तसं होणार नाही बर का यावेळी मी माझ्या लेकीकडे जाऊन छान तूप रोटी खाऊन धष्ट पुष्ट होऊन येईन आणि मग मला तू खा," आत्ता सुद्धा माझी अवस्था अगदी मागच्यावेळी सारखीच आहे बघ नुसतीच हाड दिसतायेत."
म्हातारीचं बोलणं ऐकून वाघोबा पुन्हा फसला आणि म्हातारीला म्हणाला "ठीक आहे ठीक आहे पण मी तुझी वाट बघतोय हे विसरू नकोस ह,"
म्हातारीला थोडं हायसं वाटलं आणि ती पुढे निघाली पुन्हा एकदा थोडंसं पुढे गेल्यावर तिला आडवा आला कोल्होबा
कोल्होबा ने सुद्धा वाघोबा सारखीच म्हातारीची चौकशी सुरू केली पुन्हा वाघोबाप्रमाणेच म्हातारीने कोल्होबाला सुद्धा फसवले बर का आणि म्हातारी थेट पोचली तिच्या लेकीच्या घरी.
लेकीने छान पाहुणचार केला आईला खाऊ घातले.
म्हातारी तृप्त झाली. निघायचा दवस उजाडला आणि म्हातारीला पुन्हा एकदा वाघोबाची आणि कोलोबा ची आठवण आली. तशी ती लेकीला म्हणाली "आता पुन्हा भेट होईल का नाही ठाऊक नाही".
त्यावर म्हातारीची लेक म्हणाली "असं का म्हणतेस आई काय झालं". म्हातारीने येताना घडलेली गोष्ट तिच्या लेकीला सांगितली. लेकीने सुद्धा ती शांतपणे ऐकून घेतले आणि यावर काय तोडगा निघतो का हे पाहायला सुरुवात केली.
तिच्या चटकन लक्षात आले की आपण आता या गाडीला ऑटोमॅटिक बनवू शकतो आणि हवेतून उडवू शकतो मग आई मस्तपैकी हवेतून उडत उडत आपल्या घरी जाईल आणि तिला वाघोबाचा आणि कोल्होबाचा काही त्रास नाही होणार.
लेकीने मग जवळच्याच मेकॅनिकलला बोलवून आईची गाडी दुरुस्त करून घेतली आणि म्हातारीला गाडीमध्ये बसायला सांगितले आणि तिला सर्व माहिती सांगितली.
म्हातारी आता निर्धास्त झाली आणि गाडीत बसून निघाली पुढच्या प्रवासाला जाता जाता तिची गाडी जंगलावरून जायला लागली आणि जाताना कमळाबाईने सहजच खाली पाहिले तर तिला तोच वाघोबा आणि कोल्होबा तिच्या गाडीकडे पाहताना दिसले दोघेही पुन्हा एकदा हिरमुसले झालेले पाहून ती खुदकन हसत म्हणाली
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक !!
चल रे भोपळ्या टुणुक टुणुक!!
पहा आत्ताच्या जगातली म्हातारी किती हुशार हो ना!!.