तू भेटशील नव्याने
तू भेटशील नव्याने
कोसळत्या पावसात
चिंब चिंब भिजलेली
झेलताना थेंब थेंब
नववधू सजलेली
नाही केलास शृंगार
ओलितात नटलेली
अनोळखी भेट तुझी
पावसात पटलेली
ठाऊक नव्हते मला
तू भेटशील नव्याने
प्रेमाची दिसली वाट
या पावसाळी दिव्याने
वाढले सौंदर्य तुझे
भिजलेल्या केसातही
संकोचू नकोस अशी
आग लागे नेत्रातही

