माझी मनी माऊ
माझी मनी माऊ
1 min
50
माझी मनी माऊ गोरी गोरी
पकडायला जाती साऱ्या पोरी
दूध पिते गटा गटा
भात खाते मटा मटा
लागलाय साऱ्यांना तिचा लळा
शेपटीने करते वळ वळा
म्याऊ म्याऊ चा लावते गजर
उंदरावर असते तिची नजर
कुशीत येऊन बसते द्वाड
पुरवून घेते सारे लाड
