नात्यांचे नंदनवन
नात्यांचे नंदनवन
मायेचा स्पर्श जेव्हा
नात्यांना होतो अलवार
घट्ट होऊनी वीण
नाते फुलते बहारदार
स्वच्छ निखळ नात्यात
येतो जेव्हा मोकळेपणा
जन्मभराच्या अमाप
साठवल्या जातात खुणा
कधी गोडवा कधी कटूता
बोलण्यात जरी आली
समजुतीने नात्यातली
मैत्री मात्र दृढ झाली
नातं रक्ताचं मैत्रीचं प्रेमाचं
विश्वासाने लागत जपावं
खरेपणा सांभाळताना
नाही लागत कुणाला लपावं
नात्यांचे हे नंदनवन
प्रत्येकाच्या असाव अंगणात
आनंदाने आयुष्य मग
फुलेल त्या प्रांगणात