माऊली
माऊली
माया डोळ्यात नांदते
सोबतीस तिचा राया
प्रेम ओसंडून वाहे
कुटुंबास तिची छाया
पदराला डोईवर
सावराया शिकवते
माणसाला जोडताना
घट्ट नाती टिकवते
हसू चेहऱ्याचा डाग
बिंबवते मनावर
वाणी मधाळ बोलकी
रुचकर कानावर
अनुभव हाच गुरु
सांगे प्रत्येकाच्या कानी
जरी फाटका संसार
तिच्या मनाची ती राणी
दान देई संस्काराचे
उपकार तिचे थोर
विन घातलेली घट्ट
नका तुटू देऊ दोर.
