आई
आई
दिनरात करी सेवा
राबतात तिचे हात
किती फाटले आभाळ
करी कष्टाने ती मात
जीव पिल्लात गुंतला
तरी कष्टाने झुंजते
घाव टाकीचे सोसून
आनंदाने ती नांदते
माया लावी जीवापाड
नसे त्याला काही तोड
तिचा वावर भोवती
त्याला संस्काराची जोड
कधी वागते कठोर
धडे शिस्तीचे शिकवी
ठेच लागता पायाला
दिवा प्रेमाचा दाखवी
आई प्रेमाचा प्रकाश
राही तेवत सदैव
तिच्या असण्याने सदा
वाढे घरात वैभव
